गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०१४

सांग मरणा येशील केव्हा ?

सांग मरणा येशील केव्हा ?
प्राण पाखरू नेशील केव्हा ?

इकडे-तिकडे बघं दुही माजली!
पापाची शय्या पूण्याने सजली,
मानवतेने टाहो फोडला,
धर्माचा जणु सुर्यच बुडाला?
या रक्तरंजीत वसुधेकडे बघं!
मोक्ष हिजला देशील केव्हा ?
सांग मरणा येशील केव्हा ?

येथील होती सांज निराळी!
मयूर जणू काय पंख पसारी!
मानवा होती पुण्य पिपासा;
तो मानव आज रक्ताचा प्यासा!!
चौहिकडे हे चित्र लाजिरे;
सांग इथे मी कसा जगु रे?
सुटका यातुनी करशील केव्हा ?
सांग मरणा येशील केव्हा ?
सांग मरणा येशील केव्हा ?